Posts

Showing posts from 2019
Image
येवदा, दि .१८
येवदा   येथे कॅन्डल मार्चचे आयोजन
 पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता येवदा येथे रविवारी सायंकाळी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्‍यात आले,  या कार्यक्रमांमध्ये येवदा येथील अबाल, वृद्ध, महिला ,युवकांसह  हजारोच्या संख्येने   नागरिकांची उपस्थिती या वेळी होती ,प्रत्येक नागरिकाच्या मनात दुःख तसेच आक्रोश दिसून येत होता,  शहीद जवान अमर रहे, भारतमाता कि जयच्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला होता तसेच पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला , या वेळी प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यातून अश्रू तरळले तसेच संपूर्ण देश  आमच्या सैनिकांच्या पाठीशी असल्याची  भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.देशाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Image
येवदा -दर्यापूर मार्गावर ट्रँक्टर वर दुचाकी धडकून  अपघात 
गलाठी नाल्याच्या पुलावरील घटना 
अकोट येथून  दर्यापूर कडे जात असलेल्या दुचाकीची ट्रॅक्टरला समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील  दोधे जण  जखमी झाले,  सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सदर घटना  सांगळुद जवळील  गलाठी नाल्याच्या पुलावर घडली ,  पंकज भिमराव सोनोने व प्रफुल्ल रामकृष्ण धनबहादुर,  दोघेही राहणार आकोली जहांगीर  हे दोघे युवक यात  जखमी झाले ,  पंकज हा येवद्यावरुन दर्यापूर ला जात असतांना त्याच्या दुचाकी क्रमांज एम एच ३०.वाय ९७५५ वरील नियंत्रण सुटल्याने  हि दुचाकी ट्रँक्टर क्रमांक एम ए एच  27 ए 7884 वर आदळून अपघात झाला, नेमक्या त्याच वेळी येवदा येथील कार्यक्रमा करिता  नवनित राणा जात होत्या त्यांनी जखमी झालेल्या युवकांना मदत करून तात्काळ दवाखान्यात रवाना केले, येवदा पोलीसांना घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून दोन्ही वाहने येवदा पोलीस स्थेशनला आणली, पुढील तपास ठानेदार नितीन चरडे यांच्या मार्गदर्शनात येवदा पोलीस करीत आहेत.