Sunday, February 17, 2019

येवदा -दर्यापूर मार्गावर ट्रँक्टर वर दुचाकी धडकून  अपघात 

 

गलाठी नाल्याच्या पुलावरील घटना 

अकोट येथून  दर्यापूर कडे जात असलेल्या दुचाकीची ट्रॅक्टरला समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील  दोधे जण  जखमी झाले,  सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सदर घटना  सांगळुद जवळील  गलाठी नाल्याच्या पुलावर घडली , 
पंकज भिमराव सोनोने व प्रफुल्ल रामकृष्ण धनबहादुर,  दोघेही राहणार आकोली जहांगीर  हे दोघे युवक यात  जखमी झाले ,  पंकज हा येवद्यावरुन दर्यापूर ला जात असतांना त्याच्या दुचाकी क्रमांज एम एच ३०.वाय ९७५५ वरील नियंत्रण सुटल्याने  हि दुचाकी ट्रँक्टर क्रमांक एम ए एच  27 ए 7884 वर आदळून अपघात झाला, नेमक्या त्याच वेळी येवदा येथील कार्यक्रमा करिता  नवनित राणा जात होत्या त्यांनी जखमी झालेल्या युवकांना मदत करून तात्काळ दवाखान्यात रवाना केले, येवदा पोलीसांना घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून दोन्ही वाहने येवदा पोलीस स्थेशनला आणली, पुढील तपास ठानेदार नितीन चरडे यांच्या मार्गदर्शनात येवदा पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment