Friday, October 4, 2019

येवदा, दि .१८
येवदा   येथे कॅन्डल मार्चचे आयोजन पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
अर्पण करण्याकरिता येवदा येथे रविवारी सायंकाळी कॅण्डल मार्चचे आयोजन
करण्‍यात आलेया कार्यक्रमांमध्ये येवदा येथील अबाल, वृद्ध, महिला
,युवकांसह  हजारोच्या संख्येने   नागरिकांची उपस्थिती या वेळी होती
,प्रत्येक नागरिकाच्या मनात दुःख तसेच आक्रोश दिसून येत होताशहीद जवान
अमर रहे, भारतमाता कि जयच्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला होता तसेच
पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला , या वेळी
प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यातून अश्रू तरळले तसेच संपूर्ण देश  आमच्या
सैनिकांच्या पाठीशी असल्याची  भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त
केल्या.देशाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना
भावपूर्ण श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात
आली.

No comments:

Post a Comment