Tuesday, October 29, 2019

पिंपळोद येथे सापडला दुर्मिळ खवल्या मांजरयेवदा , दि २९
दर्यापूर तालुकयातील पिंपळोद येथे दुर्मिळ प्रजातीत मोडत असलेले खवले मांजर
    आढळल्याने परिसरातआश्चर्य व्यक्त केल्या जात आहे .  या विचित्र दिसणाऱ्या प्राण्याबद्दल 
 बहुतांश  जणांना माहिती नाही त्यामुळे काहीवेळ पिंपळोद येथील नागरिकात काहीवेळ भीतीचे
 वातावरण तयार झाले होते परंतु इंटरनेटच्या साह्याने येथील सुजाण नागरिकांनी या प्राण्याची 
माहिती शोधून काढली व या प्राण्याला जीवदान मिळाले. 
पिंपळोद येथील रहिवाशी दिनकर डोरस यांना त्याचे भाऊ दिलीप डोरस यांच्या घराकडे जातांना
 सायंकाळच्या सुमारास हे खवले मांजर दिसले त्यांनी इतरांना या बाबत माहिती देताच नागरिकांनी
 या ठिकाणी एकच गर्दी केली व त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवले त्यानंतर याची माहिती येथील पोलीस 
पाटील भुजंग गावंडे यांना देण्यात आली व  त्यांनी वनविभागास या बाबत माहिती दिली ,
रात्री १२ वाजेच्या सुमारास  दर्यापूर येथून वनविभागाचे कर्मचार्यांनी पोहचून  हे खवले मांजर
 ताब्यात घेतले. यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
  मोबाईल इंटरनेट मुळे  वाचले खवले मांजराचे प्राण   
अंगावरील खवल्यांमुळे विचित्र दिसत असल्याने नागरिक घाबरून याला इजा पोहचू शकत होते 
परंतु तेथे  उपस्थित सुशिक्षित व सुजाण नागरिकांनी लगेच इंटरनेटचा आधार घेत या निरुपद्रवी
 प्राण्याची माहिती घेतली व नागरिकांना भुजंग गावंडे व शिक्षक असलेले दिलीप डोरस यांनी या
 प्राण्याबाबत माहिती देत त्याला कुठलीही इजा होऊ दिली नाही व त्याला  जीवनदान दिले त्यामुळे
 इंटरनेट जगताचे महत्व अधोरेखित झाले.    
खवले मांजर 
अतिशय दुर्मिळ व नामशेष होत चाललेले  खवले मांजर हे जगात सर्वात जास्त तस्करीचा 
शिकार होत आहेत , जवळपास ८० लक्ष ते सव्वाकोटी पर्यंत हे मांजर विकल्या जातात
 त्यामुळे तस्करांची या वर नजर असल्याने याची मोठया प्रमाणात जगात  शिकार होत आहे.
  खवले मांजराच्या अशिया खंडात ४ आणि अफ़्रिकेत चार अशा आठ जाती सापडल्या आहेत.
 आपल्याकडे आढळणारे खवले मांजर आपल्या शेजारील पाकिस्थान, नेपाळ, श्रीलंका या
 देशांमधेही आढळते. याच्या अंगावर असलेले खवले हे अर्थात क्याल्शियमने बनलेले असतात.
 या खवल्यांसाठी ह्याची प्रचंड हत्या होते. भारतीय खवले मांजर हे साधारण ८ ते ३५ किलो 
वजनापर्यंत वाढते. नावात मांजर असले तरीही या प्राण्याचे मार्जार कुळाशी अजिबात 
घेणेदेणे नसते.  खवले मांजर या प्राण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या तोडात अजिबात 
दात नसतात. मुंग्या, त्यांची अंडी, वाळवी नी तिच्या अळ्या या सारखे अन्न खाण्यासाठी
 हा प्राणी आपली लांबलचक जिभ वापरतो.  आजच्या घटकेला हा अतिशय निरुपद्रवी प्राणी 
नामशेष होण्याच्या मार्गावर आलाय. जगभर ह्याला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.
 निसर्गात वाघ, सिंह नी बिबळेच याचे शत्रू असतात. त्यांनी कधीही या निरुपद्रवी जीवाला 
संपवले नाहीये. पण मनुष्यप्राण्याने मात्र याच्या खवल्यांसाठी, मांसासाठी, कातडीसाठी मारून
 मारून याला नामषेश करायाला आणलय. चायनीज मेडीसिन्स मधे याच्या खवल्याच्या
 पावडरीचा केला जाणारा वापरच याच्या नाशाचे कारण बनलय. जगभर याच्या खरेदी विक्रीला,
 मारण्याला कायद्याने बंदी आहे. 3 Attachments
 
 

No comments:

Post a Comment