Thursday, November 7, 2019

शासकीय कामात चोरीची रेतीशासकीय कामात चोरीची रेती
दि . ०७/११/२०१९
सर्जीव बहुराशी (चंद्रपूर )

 दर्यापूर तालुक्यातील चंद्रपूर गावात शासकीय कामावर चोरीच्या रेतीचा वापर मोठ्याप्रमाणात सुरु आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय कामावर अवैद्यरित्या चोरून आणलेली रेती टाकल्या जात आहे.
चंद्रपूर गावातील प्रभाग क्रं 2 व 3 ला दूभाजणार्या रस्त्याच्या कामाकरिता आमदार कोट्यातून निधी देन्यात आला आहे.परंतू कंत्राटदार या कामावर चोरीच्या रेतीचा वापार करीत आहे. चंद्रभागानदीपात्राचे जेथे लिलावच झाला नाही या नदीपात्रातूण गाढवांमार्फत शासकीय कामावर वाळूची अवैद्यरित्या वाहतूक केल्या जात आहे.याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते आहे.परंतू चंद्रपूर येथील आमदार निधीतून होत असलेल्या कामामध्ये कंत्राटदार या रेतीचा वापर करीत शासनाला चुना लावत आहे.त्यामुळे महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.व कंट्रातदार मात्र या संधिचे सोने करीत आहे .गाढवांमार्फत अवैद्यरित्या वाहतूक करून आणलेल्या रेतीमुळे नदीपात्रापासून ते कामापर्यंत रस्त्याने रेती पडली आहे ज्यामूळे दुचाकी घेऊन जानारया नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.याचा मोठ्या प्रमाणावर त्रास येथील नागरिकांना  होत आहे.प्रशासनाने याकडे लक्ष देवून त्वरित ही वाहतूक बंद करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.

No comments:

Post a Comment